एकीकडे वटपौर्णिमेच्या दिवशी पुढील सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली अन दुसऱ्याच दिवशी पत्नीने पतीची झोपेत असतानाच त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर मधील शिकारपूर गावात घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिकारपूर गावात एक वकिल आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले होते परिवारातील लोकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला.

पोस्टमार्टम दरम्यान समोर आलं की,त्याचा प्रायव्हेट पार्ट कापलेला आहे. यानंतर पोलिसांनी रफीकची पत्नीची चौकशी केली.पोलिसांच्या चौकशी दरम्यान तिने कबूल केलं की, संबधीत वकिलासोबत तिचे लग्न झाले होते. पण त्याने दुसरं लग्न केले होते.

Advertisement

मात्र, काही कारणाने दुसरी पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे त्याला तिसरे लग्न करायचे होते. तिने पतीच्या तिसऱ्या लग्नाला विरोध केला होता. यावर रागावलेल्या त्याने तिला मारहाण केली होती.

याच गोष्टीला वैतागून तिने पती झोपेत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याची हत्या केली. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Advertisement