मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut) यांच्या घरावर काल (31 जुलै) सकाळीच ईडीची (ED raids) धाड पडली आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही धाड पडली असून, दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घरी ईडीच्या (ED raids) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले होते. त्यानंतर ईडीने याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. मात्र, दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

Advertisement

आज संजय राऊत यांना सकाळी 11:30 वाजता यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी संजय राऊत यांची ओळख आहे.

दरम्यान संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तीन ते चार महिन्यांपूर्वीची वक्तव्ये सध्या चर्चेत आहेत.

या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेलं भाकित खरं ठरल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Advertisement

काय म्हणाले होते, राज ठाकरे…

12 एप्रिल 2022 रोजी एका जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, “आज पवारसाहेब (shard pawar) संजय राऊंतवर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही.” असं ते म्हणाले होते.

दरम्यान, राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली असून, अनेक नेत्यांनी यावर आपली मते मांडली आहेत.

Advertisement