Pune : गेल्या काही दिवसांपासून मुंबई नंतर पुणे राज्यभरात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. आज एका दिवसात (२६ जानेवारी) पुणे शहरात कोरोनाच्या ५ हजार ५२१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात शहरातील ६ हजार ३३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजची आकडेवारी पाहिली तर बाधिंतापेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे.

सध्या पुणे शहरात ४४ हजार ४५२ रुग्ण सक्रिय आहेत. आज शहरात एकूण पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश होता. सध्या शहरात ३४२ कोरोनाबाधित रुग्ण ॲाक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ४६ आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ३५ रुग्ण आहेत.

Advertisement