Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

‘पुण्याचे शिल्पकार..विकास पुरुषा’ला टोला

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून पुण्यात भाजपने त्यांची मोठमोठी होर्डिंग्ज लावली आहेत.

त्यावरील मजकुरावरून आता फडणवीस आणि भाजपवर टीका सुरू केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ‘यापेक्षा दुसरा विनोद असू शकत नाही,’ असं भाष्य केलं आहे.

पुण्याचे शिल्पकार.. विकासपुरुष..

फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी त्यांची होर्डिंग्ज लागली आहेत.

Advertisement

त्यावर नव्या पुण्याचे शिल्पकार, विकासपुरुष अशा उपमा फडणवीसांना देण्यात आल्या आहेत. त्यावरून मिटकरी यांनी ट्वीट करून फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मिटकरी यांच्यासह काही पुणेकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बॅनर्सवर टीका केली आहे.

धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त’

‘आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही.

Advertisement

धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त’, अशा शब्दांत मिटकरी यांनी फडणवीसांच्या बॅनरवरून आणि त्यांना नव्या पुण्याचे शिल्पकार म्हटल्यावरुन टोला लगावला. या ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका बॅनरचा फोटोही टाकला आहे.

फलक ट्रोलवर

फडणवीस यांचे पोस्टर्स पुण्यातील रस्त्या रस्त्यांवर, अनेक महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यावरुन अनेक पुणेकरांनी ट्वीटरवर सकारात्मक तर अनेकांनी ट्रोल करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Advertisement
Leave a comment