दुचाकीला धक्का लागल्यामुळे गाडी नीट चालवण्यास सांगितल्यामुळं बीएमडब्लू कार चालकाने महिलेला भररस्त्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली.

फातिमानगर चौकात ही घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात कार चालकावर व कारमधील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारचा पायाला धक्का

याबाबत २३ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार कार चालक व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी तिच्या वहिनीसोबत दुचाकीवरून जात होती.

Advertisement

त्या वेळी कार चालक वाहतुकीचे नियम मोडून पाठीमागून भरधाव वेगानं जात असताना तक्रारदाराच्या वहिनीच्या पायाला धक्का लागला. त्यामुळे तक्रारदार तरुणीने कार चालकाला गाडी हळू चालवा, अशी विनंती केली.

तरुणीच्या हाताला गंभीर जखम

तरुणीने कार हळू चालवण्यास सांगितल्यानं राग अनावर होऊन कार चालकाने तरुणीला शिवीगाळ केली. त्यानंतर फातिमानगर चौकात कार थांबवून लाकडी दांडक्याने तरुणीच्या पाठीवर, खांद्यावर कार चालकाने मारहाण केली. यामध्ये तरुणीच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

Advertisement