पुणे – जेवणासोबत लोणचे (Pickle) प्रत्येक प्रकारच्या थाळीची चव वाढवते. आंब्यापासून फणसापर्यंत विविध प्रकारची लोणची (Pickle) बनवली जातात. रोटी, पराठा, भातासोबत लोक मोठ्या आवडीने खातात. आंबा, मिरची, गाजर तुम्ही अनेक प्रकारचे लोणचे चाखले असतील पण टोमॅटोचे लोणचे (Tomato Pickle) कधी ऐकले आहे का?

जर तुम्ही अजूनही हे स्वादिष्ट लोणचे (Pickle) खाण्यात कमी पडत असाल तर ही रेसिपी नक्की करून पहा.

टोमॅटोचे लोणचे (Tomato Pickle) तुम्ही क्षणार्धात तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला स्वादिष्ट टोमॅटो (Tomato Pickle) लोणच्याची रेसिपी सांगत आहोत.

साहित्य :

– 500 ग्रॅम टोमॅटो बारीक चिरून (पिकलेले)

– हळद पावडर

– एक चमचा मेथी पावडर

– एक चमचा मोहरी

– 4 चमचे लाल मिरची पावडर

– 2 चमचे आले, बारीक चिरून

– 8 ते 10 कढीपत्ता

– एक चमचे मोहरी

– चिमूटभर हिंग

– 2 पूर्ण, कोरड्या लाल मिरच्या

– चवीनुसार मीठ

– 3 चमचे तेल

टोमॅटो लोणचे कृती :

– कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी टाका.
– यानंतर आले घालून मध्यम आचेवर 2 मिनिटे परतून घ्या.

– नंतर त्यात कढीपत्ता, हिंग आणि लाल मिरच्या घाला.
– कढीपत्ता कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करा आणि एका भांड्यात तेलाचे मिश्रण काढा.

– नंतर त्याच कढईत थोडे तेल टाकून गॅसवर गरम करा.
– आता त्यात टोमॅटो आणि मीठ घालून मिक्स करा.

– नंतर पॅन झाकून ठेवा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
– यानंतर टोमॅटोमध्ये हळद, लाल तिखट, मोहरी आणि मेथी पावडर घाला.

– आता त्यात तेलाचे मिश्रण घालून मिक्स करून शिजवा.
– टोमॅटोपासून तेल वेगळे झालेले दिसले की गॅस बंद करा.

– टोमॅटोचे लोणचे तयार आहे.
– थंड होऊ द्या आणि बरणीत साठवा.