अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उकडीस आला असून मंगळवारी (दि.१५) चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य संभाजी हरेगावकर (वय २१, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. धमार्बाद, जि. नांदेड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ एप्रिल २०२१ रोजी बिजलीनगर चिंचवड येथे घडला आहे.फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकत्र हॉलमध्ये झोपले होते.

Advertisement

त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली.