Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

चित्रपट पाहण्यासाठी नेलेल्या तरुणीवर अत्याचार

तरुण ओळखीचा असला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकते. पुण्यातील एका तरुणीला असा अनुभव आला आहे.

ओळखीच्या तरुणासोबत चित्रपट पाहायला गेलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीचे आैषध देऊन तिच्यावल बलात्कार करण्यात आला.

तेवढ्यावर न थांबता तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करण्यात आले; शिवाय तिचे ३५ हजार रुपये लुटण्यात आले.

घटना खराडी परिसरातील

हा धक्कादायक प्रकार चंदननगर खराडी परिसरात घडला. या प्रकरणी मुकेशकुमार जाखड (24, रा. चंदननगर, मूळ- राजस्थान) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणी आणि मुकेशकुमार यांच्यात ओळख झाली होती. त्यानंतर त्याने पीडित तरूणीला सिनेमा पाहण्यासाठी नेले.

त्याठिकाणी ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध मिसळून, तिला लॉजवर नेले. त्याठिकाणी जबरदस्तीने अत्याचार करून तरुणीचे फोटो व्हारयल करण्याची धमकी दिली.

पीडित आणि आरोपी सख्खे शेजारी

काही दिवसांनी आरोपीने तरुणीला राजस्थानातील जयपूरमध्ये बोलावून पुन्हा अत्याचार केले. एवढेच नाही तर तिच्याकडून 35 हजार रुपये फोन पेवर घेतले.

त्याशिवाय मुकेशकुमारने तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करून बदनामी केली. दोघेही मूळचे राजस्थानचे आहेत. पीडित तरुणीच्या नातेवाइकांच्या घराशेजारी आरोपी राहत होता.

तसेच ते राजस्थानमध्ये एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. पुढील शिक्षणासाठी पीडित तरुणी पुण्यात आली होती.

 

Leave a comment