ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

बंदी मोडून पर्यटक खडकवासला परिसरात

कोरोनाचे निर्बंध झुगारून पर्यटक खडकवासला धरण परिसरात हजेरी लावीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दंडात्मक कारवाई

शासनाच्या आदेशानुसार पर्यटनास बंदी असल्याने नियम मोडून फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी हवेली पोलिसांनी पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी केली आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्थानिक नागरिक, व्यावसायिक, शेतकरी वगळता इतरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

साडेतीन लाखांचा दंड

पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलिसांकडून शनिवार व रविवार असे आठवड्यातील दोन दिवस कडक नाकाबंदी करण्यात येत आहे. मागील एक महिन्यात हवेली पोलिसांनी तब्बल साडेतीन लाख रुपये दंड वसूल केला आहे.

पर्यटकांमुळे स्थानिकांना मनस्ताप

नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणीसाठी वाहने अडविल्यानंतर वाहनांची मोठी रांग लागते. यामध्ये स्थानिकही विनाकारण अडकून पडतात. त्यातच काही पर्यटक पोलिसांशी हुज्जत घालत थांबून राहत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते.

 

 

You might also like
2 li