वीकएंडला पर्यटनस्थळी गर्दी होऊ नये, म्हणून जमावबंदी आदेश लागू करून,तसेच निर्बंध कायम ठेवूनही पर्यटक कुणालाही जुमानायला तयार नाहीत.

निर्बंध झुगारून पर्यटकांनी भुशी डॅमसह अन्य ठिकाणी गर्दी केली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती आहे.

जमावबंदी मोडीत

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले आहे.

Advertisement

तसंच येत्या आठवड्यातही पुणे आणि पिंपरी चिंडवडमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे; मात्र कलम 144 जमावबंदीचा आदेश धुडकावून भुशी डॅमवर पर्यटक दाखल झाले.

पोलिसांकडून कारवाई

वाढत्या कोरोनोला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी आदेश जारी केले होते. त्यामुळे पर्यटन बंदी तसेच जमावबंदीच्या आदेशाला पर्यटकांनी हरताळ फासल्याचं चित्र आहे.

दरम्यान पर्यटक भुशी डॅमवर दाखल झाल्याचं समजताच पोलिस पर्यटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पर्यटकांवर कारवाई केली आहे. डॅमवर दाखल झालेल्या पर्यटकांना पोलिसांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

Advertisement

सध्या भुशी डॅम पर्यटकमुक्त झाले असून लोणावळा, खंडाळा येथील इतर पर्यटन स्थळावर पोलिस बंदोबस्त वाढवला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.