Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

न्यासा कम्युनिकेशन या कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न !

न्यासा कम्युनिकेशन’ नामक कंत्राटी कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे राज्याच्या आरोग्य खात्यावर भरती परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे. या परीक्षेची पुढील तारीख ठरवण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी बैठक बोलावली आहे.

दरम्यान, कंपनीला डोळ्यासमोर ठेवून अटी-शर्ती शिथिल केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. आरोग्य खात्यातील क आणि ड संवर्गाच्या ६ हजार २०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली होती.

त्यासाठी तब्बल ८ लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकिटे न मिळणे, चुकीची हॉल तिकिटे मिळणे असे घोळ झाले होते. ठेकेदार कंपनी न्यासा कम्युनिकेशनने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली,

Advertisement

असा खुलासा करत राज्य सरकारने हात झटकले होते. मात्र हा निर्णय कळताच उमेदवारांचा रोष पाहून आरोग्य विभागावर माफी मागण्याची नामुष्की आली. मात्र यामुळे अनेक परीक्षार्थींचे हाल झाले.

घोटाळ्याची निवृत्त न्यायधीशामार्फत चौकशी करा :- या भरतीचे कंत्राट देण्यासाठी शासन निर्णयात वेळोवेळी बदल केले. अनेक शुद्धिपत्रके काढून निविदेतील अटी-शर्ती बदलल्या. न्यासा कम्युनिकेशन या कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. या भ्रष्टाचाराची सीबीआय किवा निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते

Advertisement
Leave a comment