वादविवाद, न्याय निवाड्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या, तरी अजून निकाल लागलेला नाही.

केंद्रीय परीक्षा मंडळाने त्यांच्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या असल्या, तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. दरम्यान, आज मंडळाची बैठक होणार आहे.

मूल्यांकनाबाबतही निर्णय
बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. शिक्षण मंडळाच्या वरिष्ठांची आज महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Advertisement

या बैठकीत बारावी बोर्ड परीक्षांचा निकालाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत बारावी निकालासंदर्भात फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचं नेमके मूल्यांकन कसे करायचे, यासाठी यापूर्वी राज्य मंडळाच्या बैठका झाल्या.

अकरावीच्या गुणांना सर्वाधिक महत्व
बारावी निकालात अकरावी परीक्षेच्या गुणांना सर्वाधिक महत्व दिले जाणार असल्याची माहिती आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या निकालासाठी जे सूत्र अवलंबण्यात आले, तेट सूत्र वापरून फॉर्म्युला अंतिम केला जाणार आहे.

Advertisement