पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या कारची काच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरटयांपैकी एकाने सिमेंट ब्लॉकने फोडून तब्बल २ लाख ३५ हजार चोरल्याचे समोर आले आहे.

त्याबरोबरच महत्वाची कागदपत्रे लंपास झाली आहेत. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली.

काय घडले ?

याप्रकरणी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पृथ्वीराज हिरामण काकडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

लोणी काळभोर येथे मॅक्डोनल्डस् सिसिडी येथे मावस भाऊ निखील उंदरे यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपये उसने घेतले. ही रक्कम त्यांनी सँकमध्ये ठेवली.

ते आपली कार घेऊन कुंजीरवाडी येथील ऑटो कॉर्नर पेट्रोल पंप येथे पोहोचले. तेथे डिझेलचे १ लाख ६० हजार रुपये चेक पेमेंट केले.

महत्वाची कागदपत्रे लंपास

त्यानंतर कार पंपाच्या डाव्या बाजूस पार्क करून तीन वाजण्याच्या सुमारास पंपासमोर असलेल्या ऑफिसमध्ये गेले. थोड्या वेळाने ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या लॉन्ड्रीवाल्याने त्यांना कोणीतरी तुमच्या कारची काच फोडल्याचे सांगितले.

Advertisement

काकडे त्याच क्षणी कार जवळ गेले असता दोन लाखांसहित कागदपत्रे चोरून नेल्याने त्यांच्या निदर्शनास आले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

Advertisement