file photo

पूर्ववैमनस्यातून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून मुलीच्या वडिलांसह चुलतीस जातीवाचक शिवीगाळ करत , कोयता व पट्टयाने जबर मारहाण केली.

करंजविहीरे (ता.खेड )येथील दलितवस्तीवर हा प्रकार घडला. चाकण पोलिसांनीयाप्रकरणी चौघांवर शनिवारी (दि.२५) अँट्रॉसिटीचागुन्हा दाखल केला.

मुलीच्या आईने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मोहित चंद्रकांतकोळेकर (रा. करंजविहिरे, ता. खेड ) याच्यासह त्याचे तीन साथीदारांवर अनुसूचित जाती, जमाती व अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

पिडीत मुलीचे कुटुंब आणि कोळेकरयांचे अनेक वर्षापासून कौटुंबिक वाद आहेत. मोहित याने फिर्यादीच्या चौदा वर्षीय मुलीस कोयत्याचा धाक दाखवून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.