पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोध वाढत चालला आहे. दोन ऑगस्ट रोजी आळेफाटा येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय समता परिषदचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष नीलेश भुजबळ यांनी दिला. पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.

भूसंपादन केले, तर आत्मदहनाचा इशारा

पूर्व हवेली, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील सर्व गावातील पाचशेहून अधिक बाधित शेतक-यांनी हायस्पीड रेल्वे होऊ दिली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

कुठल्याही परिस्थितीत जिल्हाधिकारी व प्रांताधिका-यांनी जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा सर्व बाधित शेतकऱ्यांनी दिला.

Advertisement

आमदार व खासदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, असे मत शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या मांडण्यात आले.

आमदार व खासदारांनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली तर पुढील काळात घेतली, तर त्यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

हे होते उपस्थित

सभेसाठी खेड तालुका सभापती पाटील बुवा गवारी, महाराष्ट्र राज्य युवा शेतकरी क्रांती संघटनेचे प्रसाद घेनंद, कोळवाडीच्या सरपंच शैला गाढवे, हिवरे खुर्दचे सरपंच सुरेश शिंदे, संतवाडीचे सरपंच नवनाथ निमसे, आळेचे माजी उपसरपंच संदीप डावखर, उदय पाटील भुजबळ, अजित सहाणे, शरद गाढवे, दिगंबर घोडेकर, योगेश कोरडे, नामदेव कुराडे, शिवाजी पाडेकर, नवनाथ गायकवाड, तबाजी कोरडे, मारुती लेंडे, योगेश काडेकर, गणेश गुंजाळ, अजित लेंडे, शिवदास खोकराळे, वैभव शिंदे, तानाजी कुतळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल वाघुले यांनी केले. दिनेश शिंदे यांनी आभार मानले

Advertisement