Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

दोनशे फूट ते सहा हजार फूट…राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचा प्रवास

अवघ्या दोनशे चाैरस फुटातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय…१८ वर्षे पुण्यातील राजकीय घडामोडीचं केंद्र…आता मात्र सहा हजार चाैरस फुटाच्या इमारतीत स्थलांतरित झालं आहे..

गिरे कुटुंबाचं पवार प्रेम
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजवरच्या प्रवासात पुण्यातील गिरे कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी गिरे कुटुंबीयांनी टिळक रोडवरील आपला टुमदार बंगला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासाठी दिला.

एवढेच नाही तर गेल्या १८ वर्षांपासून गिरे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागेचे भाडे किंवा लाईटबील यासाठी एक रुपयाही आकारलेला नाही.

Advertisement

स्थावर मालमत्तांचे दर गगनाला भिडत असताना पुण्यातील ‘प्राईम लोकेशन’ला असलेली आपली मालमत्ता तब्बल १८ वर्षे विनामोबदला वापरण्यास देणे, यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी गिरे कुटुंबीयांच्या मनांत असलेली प्रेमभावना दिसून येते.

गिरे बंगल्यातून प्रगतीचा आलेख
या गिरे बंगल्यातील कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बरीच लांबपर्यंत मजल मारली आहे. याच कार्यालयातून पक्षाने शहरावर आपली पकड मजबूत केली.

याच इमारतीतून अनेकदा पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा रोवला गेला. येथूनच पुणे शहराच्या प्रगतीचा आलेख रचला गेला; परंतु बदलत्या काळानुसार या कार्यालयातील जागा अपुरी पडू लागली अनेक आधुनिक सुविधांची गरज भरायला लागली.

Advertisement

प्रशांत जगताप यांचे योगदान
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हाती आली. शहराची सूत्रे हाती घेताच त्यांनी अक्षरशः संपूर्ण शहर अनेकदा पिंजून काढले.

प्रोटोकॉलला केराची टोपली दाखवत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांशी थेट संवाद सुरू केला. अवघ्या काही दिवसांतच जगताप यांनी संपूर्ण शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरामोहरा बदलण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली. याच मोहिमेचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे नवीन ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालय’.

Advertisement
Leave a comment