आंबेगाव पठार परिसरात कोयत्याने हल्ला करून एकाचा खून करण्याच्या गुन्ह्यासंदर्भात दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले.

या परिसरातील शिवरत्न चौकात गेल्या सोमवारी (दि. २४) रवींद्र राजेंद्र दिसले (रा.जांभूळवाडी) याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. त्यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या प्रकरणातील दोन सख्खे भाऊ असलेले संशयित आरोपी धायरीतील धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली.

Advertisement

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, गणेश सुतार, शिवदत्त गायकवाड व त्यांच्या पथकाने तेथे सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून त्यांनी हल्ला केल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.