Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

भिशी फसवणूक प्रकरणी आणखी दोघांना अटक

भिशी व मुदत ठेवीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार पुण्यात वाढले आहेत. लोणी काळभोर परिसरात असे अनेक प्रकार घडले आहेत. आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच

भिशी व मुदत ठेवीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणी आणखी दोघांना ऊरूळी कांचन येथे ताब्यात घेतले आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच झाली आहे.

ही आहेत आरोपींची नावे

अरूणकुमार चरणदास जोशी ( वय ६० ) व गोपाळ अरूणकुमार जोशी ( वय ३४, दोघे रा उरूळी कांचन, सुपर बॅटरीचे पाठीमागे ता. हवेली ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी फसवणूक करून नऊ महिन्यांपासून फरार असणारे भरतकुमार चरणदास जोशी ( वय ६३) व त्यांचे मुले दीपक भरतकुमार जोशी ( वय ३६), हिरेन भरतकुमार जोशी ( वय ३४, तिघेही रा. शिर्के हॉस्पिटल जवळ, ऊरूळी कांचन मूळ रा. सहयोग नगर, भुज, कच्छ, गुजरात ) यांना पाकिस्तान सिमारेषा भुज, कच्छ ( गुजरात ) येथे जावून लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकांने जेरबंद केले आहे.

दोनशे कोटींची माया जमा

तिघांनी फिर्यादी व इतर एकूण ११ जणांना ७ वर्षाच्या कालावधीवर मुदतीवर, आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी बँकेच्या खात्यावरुन व आरटीजीएसने रक्कम घेत त्यांना कसल्याही प्रकारचा परतावा न देता तसेच त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे परत न देता विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली.

तसेच काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे धनादेश व रोखीने घेत त्यांना परत न देता त्यांनी २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये एकूण ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे; परंतु भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली यांनी उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक बड्या हस्तींकडून सुमारे दोनशे कोटींहून अधिकची माया जमा केली असल्याची चर्चा आहे

 

Leave a comment