Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

ट्रकमधील सळई घुसून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : लोणीकंद परिसरात ट्रकमधील सळई घुसून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी सातच्या सुमारास झाला. सागर शंकर वाघमारे (वय २०, रा. खुळेवाडी) हे मृत तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी ‘लोणीकंद पोलिसांनी रमेश नंदकुमार साठे (वय २४, रा. पाषाण) याला अटक केली आहे. ट्रकचालक रमेश हा ट्रक घेऊन नगरहून पुण्याकडे येत होता.

महालक्ष्मी स्टीलच्या दुकानासमोर आल्यानंतर साठे याने त्याचा ट्रक अचानक वळवला. त्या वेळी पाठीमागून आलेल्या सागरला ट्रकमधील सळई लागली. त्यात तो खाली कोसळून मरण पावला.

Advertisement

तसेच लोणीकंद परिसरात कारच्या धडकेत एका ३२ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कार चालक कान्हू तुकाराम कर्डिले (वय ५३, रा. वडगाव शेरी) यालाअटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार दीपक महाले यांनी सरकारतर्फे ‘लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Leave a comment