भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार मृत्युमुखी पडल्याची घटना झाल्याची घटना गुरुवारी (दि.२६) रात्री सेनापती बापट रस्त्यावर घडली.

या प्रकरणी मोटारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सुजीत हनमंत जोशी (वय ४७, रा. दीपाली सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रस्ता) हे अपघातात मरण पावले. अभिजित जोशी (वय ५२, रा. रूद्र सोसायटी, माणिकबाग, सिंहगड रस्ता) यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार सुजीत जोशी हे गुरुवारी (२६ मे) रात्री पावणेदहाच्या सुमारास सेनापती बापट रस्त्याने निघाले होते. वेताळबाबा चौकात सेनापती बापट रस्त्यावरून विद्यापीठ चौकाकडे भरधाव वेगाने चाललेल्या मोटारीची त्यांना धडक बसली.

Advertisement

जोशी यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारचालक वरुण कुलकर्णी (वय २६, रा. बावधन) याला पोलिसांनी अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उकिर्डे तपास करत आहेत.