पाषाण परिसरात साखळी चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांकडील दोन लाखांचे दागिने हिसकावल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला आणि त्यांचा भाचा दुचाकीवरून घरी निघाले होते. सुतारवाडी परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख दहा हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

तसेच, बालाजी चौकात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीस्वार महिलेचे ९० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले.

Advertisement

साखळी चोरट्यांनी एक तासाभरात दोन महिलांचे दागिने हिसकावल्याने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. या भागातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.