मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची शस्त्रक्रिया (Surgery) झाल्यामुळे बरेच दिवस झाले ते कामावर नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून (Opposition) मुख्यमंत्री पदाचा कारभार दुसरा कोणाकडे तरी द्यावा अशी मागणी करण्यात आली होती.

महापालिकेच्या (Municipal Corporation) ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ (WhatsApp chat bot) सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी दृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजूनही कोविडचे (Covid) संकट टळले नाही. कोविड काळात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केले. त्याचे कुणी घरच्यांनी आपले कौतुक केले नाही.

Advertisement

थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. कौतुक किती होईल याची मला चिंता नाही.

दुषणं देणारे अनेक आहे. आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झाले तर महापालिकेवर खापर फोडले जाते.

नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगले ठिक आहे.

Advertisement

पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचं नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला काही अकलेची गरज लागत नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे.