मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात मैदान उतरले आहे.

आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठा यात्रेच्या माध्यमांतून विस्कटलेल्या पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेतील बंडानंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

आमदारांनी बंडखोरी केली असली तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार असून ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला (shivsena) मोठा धक्का बसला.

आणि त्यानंतर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षाचे जवळपास 40 हून अधिक आमदार सोबत घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते.

आणि त्या दिवसापासूनच महाराष्ट्रात या राजकीय नाट्याला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले.