पुणे : गेली काही दिवस झाले राज्याचे मुख्यमंत्री (CM) प्रत्यक्ष कामावर हजार राहू शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली आहे. त्यामुळे ते सभा, बैठक, आणि इतर कोणत्याही कार्यक्रमात हजार राहू शकले नाहीत. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार दुसऱ्याकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे गैरहजर आहेत.

Advertisement

यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. यावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. टीकेचे काही कारण नाही असे म्हणत त्यांनी उत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही, यावरून राजकारण किंवा टीका टिप्पणी करायचे कारण नाही. राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे, ते व्यवस्थित सुरु आहे.

त्यांच्या टीमचे सहकारी म्हणून आम्ही, तसेच इतर सर्व अधिकारी योग्य काम करत आहेत. टास्क फोर्समधील (Task Force) विख्यात डॉक्टर्स या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहेत.

Advertisement

मुख्यमंत्रीदेखील स्वतः दररोज या सर्व घडामोडींचा आढावा घेतात. त्यामुळे यात राजकारण करण्यासारखे काहीच नाही असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

पंतप्रधानांच्या बैठकीला (PM Meeting) मुख्यमंत्री गैरहजर राहिले यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रत्येक वेळी मीटिंगला प्रत्येकानेच उपस्थित राहणे आवश्यक नसते. कुणाची काही अडचण असू शकते. असेही अजित पवार म्हणाले.

Advertisement