दोन दिवसीय अधिवेशनात जनतेला समाधान देऊ असं काम केले आहे. अधिवेशनातील कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे.

ज्यांच्याकडून हे घडलं, त्यांनी लवकर सुधारावं अशी अपेक्षा करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांनी सोडलं माैन

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मंगळवारी झाली. या अधिवेशनात सर्वांत गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन आहे.

Advertisement

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. यावरून विधानसभेत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले.

या निलंबनावरून राज्यभरात भाजपने निषेध आंदोलन केले. या प्रकरणी पहिल्यांदाच ठाकरे यांनी मौन सोडलं.

जबाबदार पक्षाकडून वाईट कृत्य

ठाकरे म्हणाले, की विधानभवनात काल जे घडलं, ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आपण देतो; मात्र एकूण जे कामकाज चाललं आहे.

Advertisement

हा दर्जा खालावत चालल्याचं दिसून येते. लोकप्रतिनिधींकडून जनतेची काही अपेक्षा असते. काल जे काही दृश्य पाहायला मिळालं. शरमेनं मान खाली जाणारं कृत्य आहे.

भास्कर जाधव यांच्यासोबत जे घडलं ते ऐकल्यावर असं महाराष्ट्रात घडू शकतं यावर विश्वास बसत नाही.

सत्ता एके सत्ता हाच अट्टाहास असेल तर एकूणच सगळं वाईट चाललं आहे. जबाबदार पक्षाकडून हे घडलं असं त्यांनी सांगितले.

Advertisement

माईक असताना बेंबीपासून ओरडण्याची गरजच काय?

ओबीसी समाजाबद्दल ठराव मांडला होता. जे काही बोलायचं ते बोलावं. वेडंवाकडं करायची गरज नव्हती. सभागृहात समोर माईक असताना बेंबीच्या देठापासून ओरडायची गरज नाही.

वेडवाकडं करायचं, आरडाओरडा करायचा ही लोकशाहीचं लक्षणं नाहीत. राजदंड पळवला जातो. ही पद्धत नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपला फटकारलं.

बोगस लसीकरणातील दोषींवर कारवाई करू

लसीकरण घेतलेल्यांना कोरोना संसर्ग होत आहे. बोगस लसीकरणाबाबत जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

Advertisement

ज्या लोकांना बोगस लस दिली आहे. त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. त्यांना काय दिलं होतं. हे तपासावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

Advertisement