ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

उनाड पुणेकरांची भुशी डॅमवर गर्दी

कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले असले, तरी भुशी डॅमवर येण्यास बंदी कायम आहे. ही बंदी झुगारून उनाड पुणेकरांनी सलग दुस-या दिवशी भिशी डॅमवर गर्दी केली.

निर्बंध शिथील केल्यामुळे पुणेकरांचा बेफिकरपणा समोर आला आहे.

पर्यटक लुटतात पावसात भिजण्याचा आनंद

पुण्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे आज रविवार असल्यामुळे पुणेकरांनी भुशी डॅमवर एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे. पर्यटन बंदी असतानाही पुणेकरांनी एकच गर्दी केली आहे. कोविडचे नियम पायदळी तुडवत पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत.

विशेष म्हणजे, शनिवारी सुद्धा पर्यटकांनी अशीच गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली होती; पण कारवाईनंतरही आज पुन्हा पर्यटक मोठ्या संख्येने भुशी डॅमवर दाखल झाले आहेत.

सिंहगडावर आलात, तर दंड

शनिवार, रविवार तसेच इतर दिवशी खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला आहे.

टाळेबंदी नियमांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर मागील रविवारी सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. प्रत्यक्षात मात्र पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, सिंहगड किल्ला व आजुबाजूची पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत.

पोलिस बंदोबस्त वाढविला

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा, खडकवासला धरण चौक, डोणजे फाटा, गोळेवाडी चेक पोस्ट, खेड शिवापूरकडून येणाऱ्यांसाठी कोंढणपूर फाटा अशा ठिकाणी कडक बंदोबस्त व नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे.

 

You might also like
2 li