पिंपरी – घराकडे निघालेल्या पंधरा वर्षीय मुलीचा (girl) ट्रकच्या (truck) चाकाखाली आल्याने दुर्दैवी अंत (killed) झाला. ही घटना निगडी गावठाण येथील रस्त्यावर रविवारी सकाळी घडली आहे. दरम्यान, या घटने मुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली असून, नागरिक देखील आपल्या मुलांना घराबाहेर सोडण्यास घाबरत आहेत.

या अपघातात (truck crushed) मरण पावलेल्या चिमुरडीचे नाव तन्वी विनोद गव्हाणे (वय 15, रा. भोसरी) असं आहे. या प्रकरणी जयश्री काळभोर यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांची मुलगी आर्या काळे व तन्वी दोघेजनी रविवार सकाळी आपल्या घराकडे निघाल्या होत्या. आणि याच दरम्यान,

Advertisement

रस्त्यावर ट्रॅफिक असल्यामुळे दोघी बाजूला थांबल्या. आणि तेथून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम एच 4 बी जी 7463) तन्वीला चिरडले.

यात ती गंभीर जखमी होऊन मरण पावली. दरम्यान, याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Advertisement