पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) हे पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) जय्यत तयारी कारणात आली आहे. तसेच महापालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

अमित शाह यांनी महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे भूमिपूजनही अमित शाह (Amit shah) यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्याच्या विकासाबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi government) अनेक कामे केली. विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला आहे. पुण्याला लवकरच मेट्रो मिळेल.

Advertisement

स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी दिले. बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने १ हजार अतिरिक्त बसेस दिले. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी ११० कोटीचे काम सुरू आहे. सर्वाधिक स्टार्टप पुण्यातच आले आहेत.

पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकार संकल्पबद्ध आहे. आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही. असेही अमित शाह बोलताना म्हणाले.

Advertisement