राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व आस्थापना सुरू करण्याचा प्लॅन तयार आहे. वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार असल्याची माहिती आहे.

लसीकरण झालेल्या नागरिकांना उपस्थितीमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याचे समजते. महत्वाची बाब म्हणजे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नाही.

टास्क फोर्सचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे

राज्यात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने अनलॉक केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीनं हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.

Advertisement

या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अहवालाबाबत चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हॉटेल, रेस्टॉरंट रात्री दहापर्यंत

पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यात रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री दहापर्यंत केली जाणार आहे.

तसंच 50 टक्क्याची मर्यादाही काही प्रमाणात शिथील केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं गरजेचं आहे.

Advertisement

तसंच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यात प्राधान्य देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.

शक्य असेल तिथं मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल व्यवसायिकांना दिल्या जाणार आहेत.

लसीकरण झालेल्यांना सवलती

दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढवून दिली जाणार असल्याचं समजतं. दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेलं असणं गरजेचं आहे.

Advertisement