गेल्या चार-पाच दिवसांपासून एका उच्चभ्रू कुटुंबातील तिघांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले आहे. कुटुंबप्रमुखानेच पत्नी आणि मुलाची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. सहलीला गेल्या कुटुंबातील तिघांच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.

खुनाचे आणि आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

पुण्यात एका उच्चभ्रू सोसायटीत पती-पत्नी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा असं अवघं तीन जणांचं हे कुटुंब होतं. हे कुटुंब घरातून सहलीला गेलं असताना या कुटुंबातील महिला आणि तिच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली.

Advertisement

त्यांचा मृतदेह पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आला. त्यानंतर या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख म्हणजेच मृत महिलेच्या पतीचाही मृतदेह पोलिसांना खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सापडला.

या प्रकरणावर पुणे पोलिसांचा तपास सुरू असून या तपासात पोलिसांसमोर अनेक कंगोरे उभे राहिले आहेत. खुनाचे आणि आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

नेमकं प्रकरण काय?

Advertisement

पुण्यात 15 जून रोजी सकाळी सासवड येथे एका महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेचं नाव आलिया शेख असं आहे. आलिया यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ आलिया यांचा आठ वर्षांचा मुलगा अयान शेख याचा मृतदेह आढळला.

अयानचा गळा दाबून खून करण्यात आली, हेदेखील पोलिसांच्या तपासात समोर आलं. पोलिसांनी तपास केला असता ते दोघं आबीद शेख (वय 35) सोबत सहलीला कारने घराबाहेर पडले होते. आबीद हा आलियाचा पती आणि अयानचे वडील होते.

सीसीटीव्ही कॅमे-याचा फायदा

Advertisement

कारने प्रवास करणाऱ्या तीन जणांपैकी दोन जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले. त्यानंतर तिसरी व्यक्ती पुणे-सातारा रोडवर गाडी पार्क करतो. तिसरी व्यक्ती म्हणजे आबीद हे तेथील सीसीटीव्हीत कार पार्क करताना दिसत आहेत.

त्यानंतर ते स्वारगेटच्या दिशेला पायी जाताना दिसतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी आबीद यांचादेखील मृतदेह आढळला. च्या खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली.

मुलाच्या आजारपणामुळे कुटुंबात होते वाद

Advertisement

पोलिसांना आतापर्यंत केलेल्या तपासात काही महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत. अयान याला ऑटिझम हा आजार होता. या मुलाचा सांभाळ करण्यावरुन पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचा, अशी माहिती समोर आली. त्याच वादातून आबीद यांनी पत्नी आणि मुलाचा खून केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.