पिंपरीमधील एफएफआय चिटफंड कंपनीचे मालक आनंद साहेबराव उनवणे यांचे तीन फेब्रुवारी 2021 रोजी अपहरण करण्यात आले होते.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे चार फेब्रुवारी रोजी उनवणे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील आरोपीच्या वडीलांना २८ लाखांसह अटक करण्यात आली.

लाखोंची मालमत्ता घेऊन पसार

लाखोंची मालमत्ता घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या वडीलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या उनवणेंच्या खून प्रकरणातील आठव्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Advertisement

आनंद उनवणे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी उमेश मोरे याचे वडील लाखोंची मालमत्ता घेऊन पसार झाले होते. त्यांना बंगळूर शहरातून अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम, असा 27 लाख 90 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुधीर मारुती मोरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सात जणांना आधीच अटक

यापूर्वी पोलिसांनी बाबू उर्फ तुळशीराम पोकळे, उमेश सुधीर मोरे, सागर दत्तात्रय पतंगे, दीपक धरमसिंग चंडालिया, राकेश राजकुमार हेमनानी, कपिल ज्ञानचंद हासवानी, प्रवीण नवनाथ सोनवणे या सात जणांना अटक केली होती.

Advertisement

 

 

Advertisement