Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

ड्रग्ज तस्करीसाठी कॉल सेंटर मॉड्युलचा वापर

कोरोना किंवा टाळेबंदीचा ड्रग्ड तस्करीवर काहीही परिणाम होत नाही. वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून तस्करी सुरू असते.

डॅग्ज तस्करीसाठी कॉल सेंटर मॉड्युलचा उपयोग करण्यात आला. या प्रकरणात गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

ड्रग्ज तस्करांनी काढले डोके वर

कोरोना महामारीत काही काळ थंडावलेल्या ड्रग तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने (एनसीबी) शहरात ड्रग तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीतील एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Advertisement

या प्रकरणात एनसीबीने एका नायजेरियनला अटक केली आहे. टोळीतील आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

कॉल सेंटरवर ड्रग्जची ऑर्डर

एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीमार्फत नायजेरियातून ड्रग तस्करी चालविली जात होती.

नायजेरियातील कॉल सेंटरवर कॉल करून ऑर्डर दिली जात होती आणि त्यानंतर मुंबई व त्याच्या आसपासच्या भागात ड्रग्जचा पुरवठा केला जात होता.

Advertisement

याबाबत एनसीबीला गुप्त माहिती मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे एनसीबीने पुढील कारवाई केली आहे.

नालासोपारा परिसरात सापळा रचून अटक

चोकियू एमेका ऑग्बोमा उर्फ मायकल नावाचा नायजेरियन नागरिक मुंबईच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात कोकेन ड्रग पुरवतो.

ही माहिती मिळताच एनसीबीने नालासोपारा परिसरात सापळा रचला आणि ड्रग पेडलर चोकियू इमेका ऑग्बोमा याला अटक केली.

Advertisement

त्याच्या अधिक चौकशीतून ड्रग्ज तस्करीसाठी टोळीच कार्यरत असल्याची माहिती पुढे आली. चोकियू हा नायजेरियामधून कार्यरत असलेल्या ड्रग्ज तस्करी टोळीचा सदस्य आहे.

तो नायजेरियात बसलेल्या त्याच्या बॉसच्या सांगण्यावरून मुंबई व आसपासच्या परिसरात ड्रग्ज पुरवित होता.

ड्रग्ज पुरवण्यापूर्वी रेकी

जर कोणाला ड्रग्ज हवे असेल तर नायजेरियातील कॉल सेंटरमध्ये कॉल करून ऑर्डर दिली जाते. ऑर्डर बुक झाल्यानंतर कॉल सेंटरमध्ये बसलेले लोक मुंबईतील चोकीयू इमेका ऑग्बोमा यासारख्या सदस्यांना संबंधित ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोचवण्याची सूचना देतात.

Advertisement

त्यानुसार ग्राहकाला ड्रग्ज पुरवण्यापूर्वी रेकी केली जाते. आसपास पोलिस किंवा एनसीबीचे कोणतेही अधिकारी नसल्याची खात्री करून ड्रग्जची डिलिव्हरी केली जाते.

ही ड्रग्ज तस्करीची टोळी पेरू, ब्राझील आणि चिली येथून मुंबईत ड्रग्ज मागवीत असल्याचे चोकीयुच्या चौकशीतून समोर आले आहे.

सध्या या टोळीतील इतर साथीदारांच्या शोध घेतला जात आहे, असे मुंबई एनसीबीईचे जॉईंट डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले.

Advertisement

 

Leave a comment