आंबेगाव येथे हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रॅप चा वापर कसा करायचा याबाबतचे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक छाया शिंदे यांनी करून दाखविले. तालुका कृषी अधिकारी टि.के. चौधरी यांच्या सूचनेनुसार उसावरील हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

हुमणीच्या प्रथमावस्थेत या सुरुवातीच्या काळात कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करतात व त्यानंतर उसाची तंतुमय मुळे खातात तर भुंगा बाभूळ, कडुलिंब,बोर आदी झाडांवर उपजीविका करतात. वळवाचा पहिला पाऊस सुरू होताच म्हणजे साधारणपणे जून महिन्यातील पहिल्या दुसऱ्या आठवड्यात भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात.

हुमणीची एक अळी प्रतिचौरस मीटर क्षेत्रावर आढळल्यास तसेच झाडांवर सरासरी वीस किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास कीड व्यवस्थापनाचे उपाय केले जातात.

वैभव वायाळ म्हणाले, मागील वर्षीही हुमणी किडीचे नियंत्रण करण्यासाठी लाई ट्रॅपचा वापर केला होता तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हुमणीचे किडे नियंत्रणासाठी किडे गोळा करणाऱ्या शेतकऱ्याला १५० रुपये किलो याप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस देत आहे.

वैभव वायळ कृषी मित्र,बाळासाहेब वायळ, गुलाब कराळे, विठ्ठल भोर यांनी लाईट ट्रॅपचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक केले आहे. त्याप्रमाणे इतरही शेतकऱ्यांनी हुमणी कीड नियंत्रणासाठी लाईट ट्रॅपचे प्रात्यक्षिक करण्याचे आवाहन नरेंद्र वेताळ यांनी केले आहे.