ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मुंबईत आज लसीकरण बंद

कोरोना लसीचे पुरेसे डोस उपलब्ध न झाल्याने मुंबईत आज लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी येऊ नका

मुंबईकरानो, उद्या सकाळी लवकर उठून पटापट आवरुन लस घेण्यासाठी जाणार असाल तर, जरा थांबा. उगाच निराशा करून घेऊ नका. कारण उद्या मुंबईत लसीकरण बंद असणार आहे.

पुरेशा लस साठ्याअभावी उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

साठा उपलब्धतेनुसार लसीकरण

कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या बंद राहणार आहे.

लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने माहिती दिली जाईल.

लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कल्याण-डोंबिवलीत लसीकरण ठप्प

मुंबईच नाही तर अनेक ठिकाण लसीच्या पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. कल्याण-डोंबिवलीत तर सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 25 लसीकरण केंद्रे आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून लसींचा साठा पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नसल्याने आठवड्यातून सरासरी दोन दिवस ही केंद्र बंद असतात. आजही साठा प्राप्त न झाल्याने उद्या म्हणजेच गुरुवारी देखील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

 

You might also like
2 li