पुणे : पुण्यासाठी कोविशील्ड लस उपलब्ध झाली असून महापालिकेच्या १५ केंद्रावर ३० ते ४४ वयोगटासाठी आॅनलाईन बुकिंग करून लसीकरणास प्रारंभ झाला आहे.

आॅनलाईन स्लाॅट ओपन

महापालिकेने सकाळी आठ वाजता आॅनलाइन स्लॉट ओपन केला आहे. उपलब्ध लसीपैकी ४० टक्के लस ही आॅन स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़.

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही देणार

हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर व ३० ते ४४ वर्षापर्यंत नागरिकांना ही लस उपलब्ध असणार आहे़. १८ वर्षे वयोगटावरील ज्यांनी २१ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे़

Advertisement

कोठे उपलब्ध होणार?

शहरातील शिवाजीनगर येथील पोलिस हॉस्पिटल, बावधन येथील डीआरडीओ, पुणे विद्यापीठ, ससून रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटल पुणे स्टेशन, एसआरपीएफ वानवडी व एनडीए खडकवासला येथे महापालिकेने प्रत्येकी १०० कोविशिल्ड लसीचा पुरवठा केला आहे