कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसंच लसीकरणाला गती देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका झोपडपट्यांत जाऊ लसीकरण करणार आहे.

पथके तयार

पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी परिसरात कोरोनाप्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम राबविण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून, त्यासाठी अधिक पथके तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

उपायोजनांबाबत बैठक

महापालिकेच्या कासारवाडी येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात विविध उपाययोजनांबाबत बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

Advertisement

प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसेवक श्याम लांडे, रोहीत काटे, राजू बनसोडे, माउली थोरात, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, स्वाती काटे, क्षेत्रीय अधिकारी अभिजीत हराळे उपस्थित होते.

प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेने हाती घेतले आहे.

हॉकी पॉलीग्रास मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनविण्याचा आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत इंदोर मॉडेलच्या धर्तीवर ‘कचराकुंडी मुक्त शहरा’ची संकल्पना राबविण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

Advertisement