ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

राज्यात ११ हजार कैद्यांचे लसीकरण

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कारागृहापर्यंतही कोरोना पोहचला होता. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून कैद्यांचे लसीकरण हाती घेण्यात आले असून दहा हजार सातशे कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

नऊ जिल्हा कारागृहांचे संर्पूण लसीकरण

राज्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांचे लसीकरण सुरू आहे. लहान असलेल्या नऊ जिल्हा कारागृहांतील सर्व कैद्यांचे लसीकरण झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कारागृहातील कैदी व कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये आतापर्यंत १३ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. नऊ कर्मचारी करोनामुळे दगावले आहेत.

स्वतंत्र तात्पुरती कारागृहे

कारागृहात कोरोनाचा संसर्ग वाढून म्हणून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तात्पुरती कारागृहेदेखील उभारण्यात आली होती. त्या ठिकाणी काही दिवस कैद्याला ठेवूनच त्यानंतर मुख्य कारागृहात हलविण्यात येत होते.

राज्यात सध्या मध्यवर्ती, जिल्हा, खुली अशी ४७ कारागृहे आहेत. या ठिकाणी साधारण ३३ हजार ४०५ कैदी आहेत. या सर्व कारागृहांत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

आतापर्यंत १० हजार ७०० कैद्यांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. लसीकरणाची प्रक्रिया सुरूच आहे.

या कारागृहांचे लसीकरण पूर्ण

राज्यात असलेल्या ४७ कारागृहांपैकी लहान असलेल्या नऊ जिल्हा कारागृहांत कैद्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

यवतमाळ, वाशीम, वर्धा, बुलडाणा, गडचिरोली खुले कारागृह, मोशी खुले कारागृह, विसापूर खुले कारागृह, आटपाडी खुली कॉलनी, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहांतील सर्व कैद्यांना लस देण्यात आली आहे.

आधार कार्ड नसलेल्यांचेही लसीकरण

आधार कार्ड नसलेल्या कैद्यांना विशेष बाब म्हणून लस देण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी देऊन आधार कार्ड नसलेल्या ४५ वर्षांवरील कैद्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

येरवडा मनोरुग्णालयातील ४७१ कैद्यांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना विशेष बाब म्हणून लस देण्यात येणार आहे.

You might also like
2 li