ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

एकाच दिवसांत आठ लाख जणांचे लसीकरण

मुंबई : कोरोनाच्या लसीकरणात महाराष्ट्र दररोज नवे विक्रम नोंदवित आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील तीन कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून, २५ टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे.

विक्रमी कामगिरी

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला.

अंतिम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या 8 लाखांवर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 57 हजार 372 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून काैतुक

लसीकरणामध्ये राज्याने केलेल्या विक्रमी कामगिरीची नोंद घेत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

यापूर्वीचा विक्रम सात लाख ३८ हजारांचा

गेल्या तीन महिन्यांत लसीकरण मोहिमेमध्ये देशात महाराष्ट्राची कामगिरी विक्रमी राहिली आहे. प्रत्येक दिवशी आधीच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे.

यापूर्वी 26 जून रोजी 7 लाख 38 हजार 704 नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण करण्यात आले होते.

गर्भवती महिलाही कोरोना लस घेऊ शकणार

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे.

आता गर्भवती महिलादेखील कोरोनाची लस घेऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना लस देण्याच्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायजेशनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे

You might also like
2 li