File Photo

पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घरोघरी लसीकरण करण्यासाठी पुण्याची प्रायोगिक पातळीवर निवड करण्यात आली असली,

तरी अजून घरोघरी जाऊन लसीकरण सुरू झालेले नाही; परंतु महापालिकेने शंभरपेक्षा जास्त लोक असलेल्या ठिकाणी जाऊन लसीकरण सुरू केले आहे.त्यात तीस हजारांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरण केंद्रावर ने येणा-यांसाठी उपक्रम

शहरात शाळा, रुग्णालयांमध्ये महापालिकेने लसीकरण केंद्र सुरू केले असले, तरी काही जणांना केंद्रांवर येता येत नाही.

Advertisement

तर ज्या ठिकाणी १०० पेक्षा जास्त जणांचे लसीकरण होऊ शकते, अशा कामाच्या ठिकाणी जाऊन मोफत लसीकरण करण्याचा प्रयत्न महापालिका करते. त्याच माध्यमातून शहरात आतापर्यंत १५९ ठिकाणी ३० हजार ३७७ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

१५९ ठिकाणी पथक

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी पर्याय आहे. त्यामुळे नागरिक मोफत लसीकरणाला प्रतिसाद देत आहेतच; पण मोफत मिळाली नाही तर खासगी रुग्णालयात जाऊन सशुल्क लसीकरण करून घेत आहेत.

मुख्य महापालिका भवनात घनकचरा विभागात मंगळवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्यापासून शहरात १५९ ठिकाणी महापालिकेचे पथक जाऊन तेथे ३० हजार ३७७ जणांना लस दिली आहे.

Advertisement

त्यामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृद्धाश्रम आणि विशेष दिव्यांगांसाठी ५५ ठिकाणी पाच हजार २०२ जणांचे लसीकरण केले, तर विविध संस्था आणि शासकीय संघटनांच्या माध्यमातून १०४ ठिकाणी लसीकरण केले. तेथे २५ हजार १७५ जणांनी लाभ घेतला.