file photo

पुणे : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आजपासून लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. पुण्यात १५७ केंद्रांवर प्रत्येकी शंभर डोस पुरवण्यात आले आहेत.

लसी देण्याचे प्राधान्यक्रम

एकूण साठ्यापैकी ४० टक्के लस या ऑनलाईन, २० टक्के लस या हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर आणि ४५ वर्षावरील नागरिकांना ऑन स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे,

तर ४० टक्के लस या २९ मार्चपूर्वी पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस म्हणून उपलब्ध राहणार आहे.

Advertisement

२३ मे पूर्वी कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना दुसरा डोस

२३ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे़ शहरातील १५ केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हॅक्सिन लसचा पुरवठा करण्यात आला असून,

यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून व ४० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे़

Advertisement