कोरोनामुळे हाॅटेल सुरू ठेवण्यास बंदी आहे. फक्त पार्सल सेवा सुरू आहे. बारामती तालुक्यातील क-हाटी या गावातील मल्हार हाॅटेलच्या वेटरनेही तसेच सांगितले. त्याचा राग येऊन हाॅटेलची तोडफोड करून राडा घातल्याचा प्रकार घडला.

११ जणांवर गुन्हा

आमच्याच गावात हॉटेल सुरू करून आम्हालाच बसू दिले नाही, म्हणून मल्हार राज नावाच्या हॉटेलची तोडफोड तसेच जोरदार राडा करणअयात आला. बारामती तालुक्यातील कऱ्हाटी या गावात ही घटना घडली.

हॉटेल बंद करून मालक घरी गेल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या साथीदारांना जमवत या हॉटेलची तोडफोड करत जोरदार राडा घातला.

Advertisement

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी या प्रकरणी एकूण 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आमच्याच गावात हाॅटेल, अन् आम्हालाच बंदी

कऱ्हाटी या गावात मल्हार राज नावाचे एक हॉटेल सुरू करण्यात आले. सध्या कोरोना प्रतिबंधक नियम लागू असल्यामुळे हॉटेलमधून फक्त पार्सल मिळेल असे येथील वेटरने सांगितले; पण आमच्याच गावात हॉटेल सुरू करुन आम्हालाच बसू देत नसल्याचे म्हणत मनात राग धरून एका माणसाने हॉटेलच्या वेटरसोबत वाद घातला.

त्यानंतर प्रकरण वाढत असल्यामुळे हॉटेलच्या मालकाने मध्यस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

सिनेस्टाईल राडा

या प्रकरणावर पडदा पडल्यानंतर हॉटेलचा मालक घरी गेला; मात्र वाद घालणाऱ्या माणसाचा राग शांत न झाल्यामुळे त्याने आपल्या मित्रांना जमवले.

तसेच मित्रांच्या मदतीने हॉटेलवर सिनेस्टाईल राडा घातला. या वेळी माणसाने जमवलेल्या टोळक्यांनी हॉटेलमधील मॅनेजरला जबर मारहाण केली.

तसेच हॉटेलमधील संगणक, शीतपेयाच्या बाटल्या फोडल्या. या बाटल्या हॉटेलमधील मॅनेजरच्या डोक्यामध्येही मारण्यात आल्या.

Advertisement