पुणे – राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. हा मुद्दा चालू असतानाच पुण्यातील (pune) मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्यावरुनही हे भोंगा प्रकरण अधिकच चर्चेले गेले.

त्यानंतर काल पुण्यातील कात्रज परिसरात (Katraj Mahararati) मनसे नेते वसंत मोरे यांनी हनुमानची महाआरती (Hanuman Mahaarti) आयोजित केली होती.

यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक आणि मुस्लिम बांधवांनीही हजेरी लावली होती.

Advertisement

दरम्यान, आयोजित केलेल्या हनुमानाच्या महाआरतीला (Katraj Mahararati) मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर राहिले.

त्यानंतर आता वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बेबनाव असल्याचेच दिसून येत आहे. वसंत मोरे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की,

पक्षातील काही असंतुष्ट आत्मे माझ्या पक्ष सोडण्याबाबत सतत अफवा पसरवत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी पक्षातच आहे,

Advertisement

आणि अशा लोकांपासून पक्षाला धोका असल्याचे आपण राज ठाकरे यांच्या कानावर घातले असल्याचे देखील वसंत मोरे यांनी सांगितले.

मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने हे नियोजन केले होते.

त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते.

Advertisement

एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील.

तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement