पुणे – पुण्याचे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. वसंत मोरे यांनी करोना सारख्या महामारीत अनेक चांगली कामे केली आहेत. त्यांनी करोना (corona) रुग्णांचा योग्य उपचार आणि सोयी मिळाव्यात या मागणीसाठी हाती दंडुका घेत अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या. तेव्हापासून वसंत मोरे (Vasant More) पुणेकरांच्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अधिक हक्काचे बनले आहेत.

दरम्यान, पुन्हा एकदा अश्याच एका कामामुळे वसंत मोरेंनी (Vasant More) लोकांच्या मनात घर केलं आहे. सध्या त्यांच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सोमवारी मध्यरात्री पुण्यातील रस्त्यावर रडत बसलेल्या एका तरुणीला वसंत मोरे यांनी सुखरूप घरी पोहोचवलं आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत संबंधित घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे.

सोमवारी रात्री बाराच्या सुमारास वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून वसंत मोरे आपल्या घरी चालले होते. यावेळी पुण्यातील कात्रज चौकातील रस्त्यावर एक तरुणी रडत असताना त्यांना दिसली.

या तरुणीची विचारपूस करून वसंत मोरेंनी (Vasant More)  तिला सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. नेमका हा प्रकार काय होता आणि काय झालं हे स्वतः वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

वाचा वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट…

काय म्हणतात वसंत मोरे…, “वेळ काल रात्रीची 11:50 मिनिटांची वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला आणि घरी जात असताना कात्रज भरचौकात एका फूटपाथ वर एक तरुणी तिच्या राहणीमानावावरून तर ती सुखवास्तु वाटत होती खुप मोठ्याने रडत बसली होती,

आजूबाजूने लोक तिच्याकडे पहात जात होती बाजूला 4 ते 5 रिक्षावाले उभे होते पण कोणच तिला तिच्या रडण्याचे कारण विचारत नव्हते, मी स्वतः गाडी चालवत होतो अचानक गाडीच्या प्रकाशात मला ती मुलगी दिसली मी गाडी थांबवली लाईट बंद न करता तिला रडण्याचे कारण विचारले तर ती आजून मोठ्याने रडू लागली…

इतक्यात एक तरुण तिकडे आला त्याने तिची ओळख असल्याचे सांगितले. मी तिला ही क्रॉस केले तर ती ही ओळखते बोली म्हणून मी तिला त्याच्या ताब्यात दिली नाही, तर तिच्या वडिलांना 4 फोन लावले त्यांनी एकही फोन उचलला नाही…

मी शेवटी तिच्या आईला फोन लावला एव्हाना 12 वाजून गेले होते आईला विचारले …. ही तुमची मुलगी आहे का ? हो बोल्या कुठे आहे तर कामावर गेली आहे… मी बोलो आहो ती कामावर नाही इकडे रडत आहे त्यावर त्यांचे उत्तर मन सुन्न करणारे होते त्या बोल्या हो का ?

आपली तरुण मुलगी रात्री 12:00 वा.अज्ञात ठिकाणी रडत बसती आणि आई बाप बिंदास घरी झोपू कसे शकतात ? मी ती मुलगी त्या अज्ञात तरुणाच्या ताब्यात देताना त्याची पूर्ण चौकशी केली आईला त्या तरुणाबाबत विचारले त्याच्या गाडीचा फोटो काढला त्याचा नंबर घेतला आणि त्याला सज्जड दम ही दिला…

तिला घरी पोचवले की फोन किंवा मेसेज कर आणि अपेक्षेप्रमाणे त्याचा मेसेज आला आणि मगच झोपलो… मनात बोलो नसेल ही कदाचित तिच्या आई वडिलांना काळजी पण एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून मी तर माझे कर्तव्य केले होते…

एव्हाना नेहमीप्रमाणे जमलेली गर्दी जमल्याप्रमाणे लगेच पांगली ही पण मी मात्र विचार करत घरी गेलो की ज्या अघटित घटना घडतात त्याला समाजातील हीच मरत चाललेली असंवेदना तर कारणीभूत नाही ना?”  या आशयाची पोस्ट वसंत मोरेंनी केली आहे.