पुणे – राज्यातील (maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (supreme court) गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) निवडणूक तारखांचा खेळ अखेर थांबवला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा असे थेट आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महापालिका निवडणुकांचा (corporation) मार्ग मोकळा झाला आहे.

आणि याच आदेशाचे पालन करून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून 2017 च्या तुलनेत 2022 च्या निवडणूकीसाठी तब्बल 8 लाख 23 हजार 916 मतदार

पुणे महापालिका निवडणुकीसाठी (pune election update) वाढल्याचे स्पष्ट झाले असून, या यादीवर तब्बल 4 हजार 273 हरकती आल्या आहेत.

Advertisement

दरम्यान, असे असले तरी अजूनही प्रभाग रचनेचा घोळ कायम आहे. महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत मोठे बदल करून तीन सदस्यीय प्रभाग रचना तर केली होती.

मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी बंडखोरी राज्यात करून 40 आमदारांना आपल्यासोबत घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला.

त्यानंतर राज्यात आता एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे सरकार आले असून सरकारने मोठा निर्णय घेत राज्यात पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग असण्याचा मोठा निर्णय घेतलायं.

Advertisement

दरम्यान, प्रभात रचनेत होणारे सततचे बदल पाहून पुण्याचे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी आता शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

“कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल. राजकारणाची चीड यायला लागली आहे, हिंमत असेल तर निवडमुकांना सामोरे जा…प्रत्येकजण सोईने प्रभाग रचना बदलतो आहे…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात हिंमत असेल तर महापौरांची निवडही जनतेतून करावी, असे म्हणत वसंत मोरेंनी (Vasant More) थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन केले आहे.

Advertisement

पुणे महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना प्रभाग रचनेमध्ये सातत्याने बदल करण्यात येत असल्याने टिका केली जातंय.

दरम्यान, यापूर्वी देखील वसंत मोरेंनी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्याची तसेच महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेत बदल करण्याचे संकेत दिले होते.

यावेळी वसंत मोरे म्हणाले होते, “सरकार बदलले, असं ऐकतोय. प्रभाग रचनाही बदलणार आहात म्हणे. सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार’. असं म्हणत मोरे (Vasant More) यांनी एक ट्विट केलंय.

Advertisement