पुणे – वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचा ठरत असलेला मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील (Chandani Chowk) जुना पूल काल (2 ऑक्टोबर) मध्यरात्री एकच्या सुमारास जमीदोस्त करण्यात आला. दरम्यान, जेव्हा हा पूल पाडण्यात आला तेव्हा तो संपूर्ण पूल पडलाच (Chandani Chowk) नाही. पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे पुलाचा (Chandani Chowk) सांगडा शिल्लक राहिल्यानं तो नंतर पाडण्यात आला.

दरम्यान, स्फोट घडविल्यानंतरही संपूर्ण पुल न पडल्यामुळे पुलाच्या मजबुतीकरणाचा मुद्दा पुढे आला असतनाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला द्यावी तसेच रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रस्त्याच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी नक्की करेन’, असे वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हटले आहे.

सहाशे किलो स्फोटके, 1350 खड्डे, पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी, गेल्या महिन्यापासून धावपळ, केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांची रेलचेल, प्रचंड मोठी यंत्रणा, तरीही पूल पूर्ण पाडू शकले नाहीत.

यावरुन एक मात्र नक्की की पुलाचा ठेकेदार किती भारी असेल! भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी व रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करेन.”

या आशयाची पोस्ट वसंत मोरेंनी केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल काल (2 ऑक्टोबर) मध्यरात्री एकच्या सुमारास जमीदोस्त करण्यात आला. त्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता वाहतूक खुली करण्यात आली. 11 तासांनी चांदणी चौकातून वाहतूक पुढं मार्गस्थ झाली.