उद्या वटपौर्णिमा हा स्त्रियांचा सन आहे. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे.

हिंदू धर्मात वटपौर्णिमेला फार महत्व दिले आहे. आज वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वट वृक्षाला ब्रम्हा, विष्णु, महेशाचं रुप मानलं जातं. अशी आख्यायिका आहे की, वटवृक्षाची पूजा केल्याने त्यांच्या पतीची रक्षा केली जाते.

पुजेकरिता लागणारे साहित्य

 1. हळद कुंकू
 2. नारळ
 3. सुताचा धागा
 4. वडाची पूजा करण्यासाठी फुले
 5. सतीचे वाण (काळे मणी, हिरव्या बांगड्या,पोत, हळद कुंकू)
 6. पूजेची सुपारी
 7. ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस (लाल कलरचा असेल तर उत्तम)
 8. ओटी भरण्यासाठी तांदूळ/गहू
 9. आंबा/कोणतेही फळ
 10. सुपारी, खारीक, हळकुंड, खोबर,बदाम
 11. वडाला घालण्यासाठी पाणी
 12. नैवेद्य/पुरणपोळी
 13. वडाला ओवळणेसाठी दिवा
 14. अगरबत्ती

वडाची पूजा कशी करावी? पहिला ताब्यातून आणलेले पाणी झाडाला अर्पण करा. त्यानंतर हळद कुंकू लावा.त्यानंतर आणलेले सूत वडाच्या झाडाला गुंडाळून घ्यावे प्रदक्षिणा घालत.तुम्ही 5,7,11,21,108 प्रदक्षिणा वडाच्या झाडाला घालू शकता.

Advertisement

प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तो दोर कापून झाडाला बांधवा लागेल, व त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करावी लागेल.

हि पूजा दोन प्रकारे केली जाते पहिल्या प्रकारामध्ये वडाच्या झाडाभोवती असणारे 4 5 खडे घेऊन त्याची पूजा केली जाते यासाठी ते खडे स्वच्छ धुवावेत व त्याची पूजा करायची तर दुसऱ्या मध्ये 1 रुपयेचे नाणे घेऊन त्यामध्ये सुपारी ठेवायची व त्याच्या वर परत 1 रुपये चे नाणे ठेवावे व त्याची पूजा करावी अशी हि करता येते.

खड्यांचे किंवा सुपारीचे पूजन करताना त्याला हळदी कुंकू लावावे व त्यांच्यासमोर ब्लॉऊस पीस ठेवायचा,त्यानंतर त्या ब्लाउज पीस वरती तांदूळ आणि 2 फळ वाहायची त्यानंतर परत एकदा तांदूळ आणि उरलेली सर्व फळ वाहावीत व त्यावरती सतीचे वाण(काकण व मनी) व काही तांदूळ आपल्याकडे ठेवावेत व नंतर बाकीच्या तांदुळांनी उरलेल्या सवासिनीची ओटी भरावी.

Advertisement

ओटी भरून झाली कि फुले वाहायची आणि नंतर नैवेद्य दाखवायचा.फुले वाहायची व त्या नंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची, दिवा लावायचा.

वटवृक्षाला शिवरूपी वृक्ष असे म्हटले जाते त्यामुळे या झाडाची पूजा केल्यामुळे स्त्रिया साक्षात महादेवाची पूजा करतात.त्याचप्रमाणे घरांमध पुरणपोळी केली जाते.

Advertisement