पुणे – ‘भारत जोडो यात्रे’ (Bharat Jodo) दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने सध्या राज्यभर आंदोलनं चालू असल्याचं दिसून येत आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) हे ब्रिटिशांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते. त्यांनीच इंग्रजांना तसं पत्र लिहिलं होतं’. असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानातून सुटण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली होती. त्यांना इंग्रजांनी पेन्शनही दिली होती, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. हा आरोप करतानाच राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचं पत्रंच जाहीरपणे दाखवलं.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) केलेल्या वक्तव्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून, अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहे.

भाजप, मनसे आणि शिंदे गटाने गेल्या तीन दिवसांपासून राहुल गांधींचा निषेध नोंदवत ठिकठिकाणी आंदोलनेही केली. मात्र, खुद्द सावरकर यांच्या वंशजांनीच ती कागदपत्रे खरी असल्याचं सांगून भाजप, मनसे आणि शिंदे गटासह सावकरप्रेमींची चांगलीच कोंडी केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चुलत नातू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना हा खुलासा केला आहे. यावेळी ते म्हणाले .., “ती पत्रं खरी आहेत. पण त्या पत्रांना माफीनामा म्हणणं चुकीचं आहे. ती अवेदन पत्रं आहेत.

सावरकर जेव्हा अंदमानात गेले होते. तेव्हा त्यांना कोणत्याच सुविधा दिल्या नव्हत्या. एका कोठडीत त्यांना बंद करून ठेवलं होतं. सामान्य बंदिवानाच्या सुविधा मला मिळाव्यात त्यासाठी त्यांनी ती अवेदनं केली होती”, असं सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी सांगितलं.