पुणे – पुणे शहर (pune) परिसरातील पवना धरण (pavana dam)इथं एक दुर्दैवी घटना घडली असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलगी आणि एका व्यक्तीचा पवना धरणात (Pawana dam) बुडून दुर्दैवी मृत्यू (boys drowned) असून, या धक्कादायक घटने मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्या जैन आणि समीर सक्सेना अशी मृत्यू (boys drowned) झालेल्या दोघांची नावं आहेत. एक संपुर्ण कुटुंब आणि काही मित्र फिरायला आले असता ही घटना घडली.

पुण्याच्या आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य अनुभवायला अनेक नागरीक गर्दी करतात. अनेक नागरीकांना फोटो आणि सेल्फीचा मोह आवरत नाही. आणि अति उत्साहात आपले प्राण गमावून बसतात.

मिळालेल्या माहिती नुसार, त्यातील पाच जणांना प्राण वाचवण्यासाठी बचाव पथकाला आणि पोलिसांना यश आलं. आर्य दीपक जैन (वय 13), समीर कुलदीप सक्सेना (वय 43), पायल समीर सक्सेना (वय 42),

लक्ष्य सक्सेना (वय 14), यश सक्सेना (वय 8), आदि चुगानी (वय 14) अशी मृतांची नावे आहेत. तर, अंश सुरी (वय 14). सक्सेना कुटुंब मुंबईतील प्रभादेवी परिसरातील रहिवासी आहे.

सक्सेना कुटुंबीय आणि त्यांच्या मुलांचे मित्र पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. फांगणे गावाजवळील धरणाच्या पाण्यात पर्यटक शिरले. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले होते.

वेळीच सगळ्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्या पर्यटकांनी मदतीचा हात दिला आणि बचाव पथकाला बोलवलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. सर्व सदस्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, मुलं पावसानंतर धरणात, नदीत किंवा तलावाच्या पाण्यात आंघोळीसाठी मौजमजेसाठी जात असतात. मात्र अशा वेळी मुलांना एकटं तलावाच्या, धबधब्याच्या किंवा नदीच्या ठिकाणी पाठवणं धोकादायक असू शकत.