मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिग्दर्शित (Directed) केलेला तसेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत असणारा ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाचा टीझर (Teaser) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या टीझरला चांगलीच पसंती मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या झुंड सिनेमाबाबत सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर या सिनेमाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज (Jhund release 4 march) होणार आहे.

या चित्रपटाचा टीझर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram account) शेअर केला आहे. हा टीझर सर्वांनाच खूप आवडला आहे.

Advertisement

View this post on Instagram

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

Advertisement

या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री आणि त्यांची ‘झुंड’ स्टाईल (Style) बघायला मिळत आहे. सोबतच बॅगराऊंडला (Background) चित्रपटातील गाण्याचं म्युझिकही (Music) ऐकायला मिळत आहे.

या सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर, हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुले आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत.

Advertisement

झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे.

महत्वाचे म्हणजे हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. नागराज मंजुळे यांना या सिनेमाच्या लेखनासाठी दोन वर्ष लागली आहेत.

Advertisement