मुंबई : पुष्पा (Pushpa) चित्रपट सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. नुकतेच रानु मंडलने (Ranu Mandal) या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी रानू मंडलला या व्हिडिओवरून ट्रोल (Troll) केले आहे.

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर (Shrivalli Song) रानू मंडलने केलेला डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अनेकांनी प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळत आहे.

तसेच काहींनी या व्हिडिओवरून तिच्यावर जोरदार टीका केली आहे. परंतु तिच्या गावाकडच्या काही लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे.

Advertisement

इसी बीच तेरी मेरी कहाणी गाण्याच्या गायिका रानू मंडळ यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामध्ये रानु मंडल अत्यंत साध्या कपड्यात दिसत असून ती पुष्पा चित्रपटातल्या श्रीवल्ली या गाण्यावर डान्स करीत असल्याचा व्हिडीओ आहे.

Advertisement

या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे रानू मंडलने त्या व्हिडीओत मजेदार डान्स केला आहे. ती एकदम साध्या कपड्यात दिसत असून त्या गाण्यावर डान्सची मज्जा घेत असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक नेटक-यांनी तिला सोशल मीडियावरती ट्रोल केले आहे.

रानू मंडल ही सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार झालेली होती. परंतु आता ती आधीसारखेच आयुष्य जगत आहे. तिच्या इंग्रजी बोलण्य़ावरून तिला अनेकदा नेटक-यांकडून ट्रोल केले जाते.

तसेच तिला अनेकदा तिच्या कपड्यावरून ट्रोल केले आहे. तिला हिमेश रेशमिया याने एक चान्स दिला होता, त्यावेळी देखील तिच्या मेकअपमुळे तिला अनेकांनी ट्रोल केले होते.

Advertisement